Ad will apear here
Next
‘आयटी’तली नोकरी सोडून देशसेवेसाठी लष्करात...
लेफ्टनंटपदी नेमणूक झालेल्या शिवराजच्या खांद्यावर स्टार लावताना त्याचे आई- वडील, दीपक गावडे आणि दीपश्री गावडे.
पुणे : ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’ या कवी कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती यथार्थ ठरवल्या आहेत त्या शिवराज गावडे याने. देशसेवेच्या स्वप्नाने झपाटलेल्या शिवराजने आयटी क्षेत्रातील भरभक्कम पगाराची नोकरी सोडून मोठ्या जिद्दीने लष्करात लेफ्टनंटपद मिळवले आहे. विशेष म्हणजे लष्करातही त्याला अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असल्याने त्याच्याशी संबंधित पदे मिळत होती; पण ती नाकारून प्रत्यक्ष सीमेवर जाऊन लढण्याची संधी देणारे पद मिळवण्याचाच त्याचा ध्यास होता. त्याच्या या जिद्दीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. 

पुण्यातील वृत्तपत्र विक्रेते आणि चार वेळा नगरसेवक म्हणून कारकीर्द केलेल्या दीपक गावडे यांचा शिवराज हा एकुलता एक मुलगा. सुखावह भविष्य असतानाही लष्करात भरती होण्याचे स्वप्न साकारणारा शिवराज आणि त्याच्या स्वप्नाची पाठराखण करणारे त्याचे आई-वडील यांचेही कौतुक करावे तितके थोडे आहे. 

डेहराडून इथल्या ‘इंडियन मिलिटरी अॅकॅडमी’मध्ये दीड वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नुकतेच १४१व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन झाले. यामध्ये शिवराजसह ३६८ युवकांचा समावेश होता. शिवराजची पायदळात ‘फर्स्ट गोरखा रायफल’मध्ये लेफ्टनंटपदी नेमणूक झाली आहे. लष्कराच्या प्रथेप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर मानांकन म्हणजेच स्टार लावण्याचा मान त्याच्या आई-वडिलांना दिला जातो. त्यानुसार, शिवराजच्या आई-वडिलांनी या दीक्षान्त संचलनाला हजेरी लावून त्याच्या खांद्यावर स्टार लावला. ‘हा क्षण आम्ही कधीही विसरणार नाही, आमच्या भावना आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. 

शिवराजने पुणे विद्यार्थी गृहातून माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी शाखेमध्ये पदवी घेतली. त्यानंतर एल अँड टी कंपनीत नोकरी केली; मात्र लष्करात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यानंतर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतीनंतर जुलै २०१६मध्ये त्याची डेहराडूनमधील ‘इंडियन मिलिटरी अॅकॅडमी’मध्ये निवड झाली. तेथे दीड वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लेफ्टनंटपदी त्याची नेमणूक झाली. 

चांगल्या पगाराची नोकरी, सुखासीन आयुष्य सोडून देशासाठी प्राणाची कुर्वंडी करण्यास तयार झालेले शिवराजसारखे युवक तरुण पिढीसाठी नक्कीच आदर्श आहेत.

( लेफ्टनंट शिवराज गावडे यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZRLBJ
Similar Posts
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे
‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा’ पुणे : ‘देश हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, देश सर्वात मोठा आहे,’ असे मत कवी, गीतकार आणि भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी व्यक्त केले.‘सीएनएन-टीव्ही १८’चे कार्यकारी संपादक भूपेंद्र चौबे यांनी जोशी यांची मुलाखत घेतली. पंचशील रिअल्टीचे अध्यक्ष अतुल चोरडिया आणि सागर चोरडिया या वेळी उपस्थित होते
‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे सलग सातव्या वर्षी नवरात्रोत्सवात घरखरेदीची सुवर्णसंधी पुणे : दर्जेदार निवासी गृहप्रकल्पांची निर्मिती व जुन्या निवासी इमारतींचा पुनर्विकास या क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रात भव्य गृहमहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language